जय भीम ..
जय भीम म्हणजे एक रेषा
व्यक्तिच्या आणि विश्वाच्या विकासाची
जय भीम म्हणजे त्रिकोण, चौकोन आणि
वर्तुळ तोडुन विस्तिर्णात पाऊल ठेवणे
जय भीम म्हणजे एक कबुली
प्रेमाची आणि बंधुत्वाची
जय भीम म्हणजे एक नकार
पारतंत्र्य आणि विषमतेला
जय भीम म्हणजे एक निश्चय
शिक्षण, संघटन आणि संघर्षाचा
जय भीम म्हणजे निश्चितता
प्रज्ञा, शील आणि करुणेची
जय भीम म्हणजे तुम्ही, आम्ही, आपण
आणि क्षितिजे वितळलेले विश्व
श्री. सुनिल वारे (महासंचालक)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे